उगाचया रुसव्यांना,
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असतं ..
एकमेकांना आठवण्याला
आणि आठवणी जपण्याला,
प्रेम म्हणायचं असतं ..
थोडसं झुरण्याला,
स्वतःचा न उरण्याला,
प्रेम म्हणायचं असतं ..
भविष्याची स्वप्ने रंगवण्यात,
आज आनंदात जगण्याला ,
प्रेम म्हणायचं असतं ..
कितीही रागावला तरी,
एकमेकांना सावरण्याला,
प्रेम म्हणायचं असतं ..
शब्दातून बरसण्याला,
स्पर्शाने धुंद होण्याला,
प्रेम म्हणायचं असतं ..
तुझा मज असा न राहता,
आपला म्हणून जगण्याला,
प्रेम म्हणायचं असतं ..
प्रेमलाल प्रेम न म्हणता
फक्त प्रेमच करण्याला,
प्रेम म्हणायचं असतं ..






