Wednesday, 15 April 2015


सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन,
कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी,
आई गाते सुंदर गाणी,

तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती,
बनवायाला सहज तिला !
आई आवडे मला. 

गोजिरवाणी दिसते आई,
शक्तिवान किती असती बाबा..
थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई,
घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर,
बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई,
थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे,
सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे मला.

No comments:

Post a Comment