Tuesday, 7 April 2015






पाऊस आठवणीतला
खुदु खुदु हसवणारा
खोटे खोटे पैसे देवून
मोठा मोठा येणारा
पाऊस आठवणीतलाधो धो कोसळणारा
शाळेच्या खिड कीतून
हळूच खुणावणारा

पाऊस आठवणीतला
कागदी होडीबरोबर वाहणारा
शाळे भोवती तळे साचवून
हमखास सुट्टी देणारा
पाऊस आठवणीतला
चिंब चिंब भि जवणारा
आईच्या हातचा चहाची
लज्जत अजूनच वाढवणारा
आता आता पाउस
रुसल्या सारखा वाटतो
रौद्र रूपातल्या बातम्या
बनून एफ बी वर आदळतो

No comments:

Post a Comment