Thursday, 23 April 2015

एकदा एका डोळे मध्यल्या अश्रुने दुस-याला विचारले……


एकदा एका डोळे मध्यल्या अश्रुने दुस-याला विचारले……
‘ए का रे आपण असे
ना रंग, ना रूप,
नेहमीच मात्र चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा अहेर,
कोणीच कसे थांबवत नाही आपल्याला,
किनारा ही साधा नाही या पापण्याला…………
दुस-यालाही जरा मग प्रश्न पडला,
खुप विचार करून मग तो बोलला,
रंग-रूप नसला तरीही,
चिडीचुप असलो जरीही,
आधार ठेवतो भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपणच ,
अंतरीही खोल आपणच ,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच मात्र महत्व,
आपल्याला कोणी नाही थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बांधु शकत,
उद्रेक आपल्या मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील स्पंदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुळेच आज हे जग उभे आहे.
अशीच आपली ही कहाणी………
ऐकून अश्रुंची ही वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत हळुच आले पाणी……..

1 comment: